शनिवार, जून 3, 2023
घरक्राइमनाशिकमधील नगरसेविकेच्या पतीकडे पंधरा लाखांची खंडणी

नाशिकमधील नगरसेविकेच्या पतीकडे पंधरा लाखांची खंडणी

नाशिक । प्रतिनिधी
भाजप नगरसेविकेच्या पतीकडे पंधरा लाखांची खंडणी मागणाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित काही दिवसांपासून ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्याची धमकी देत असल्याची तक्रार नगरसेविकेच्या पतीने पोलिसात केली आहे.

अनिकेत निकाळे असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की माने भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका प्रियंका माने यांनी प्रभागात नेतृत्व केले आहे. काही दिवसांपासून संशयित निकाळे याने पंचवटी पोलीस ठाण्यात, पोलीस आयुक्तालय सहाय्यक आयुक्त कार्यालयात खोटे तक्रार अर्ज केले होते. त्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याचे नमूद केले होते. माने यांनी पोलीस ठाण्यात जबाबही लिहून दिला आहे.

दरम्यान तरीदेखील संशयिताने पोलिसांना पुन्हा तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी १५ लाखांची खंडणी मागितली आणि एका व्यक्तीला मनपा मध्ये नोकरी अशी मागणी केली. संशयिताने माने यांच्या मित्राला वारंवार फोन करून खंडणी देण्याची मागणी केली. माने यांनी वाद मिटवण्यासाठी एका बँकेतून ५० हजारांची रक्कम काढून त्याला दिली.

सदर घटनेचे माने यांनी चित्रीकरण करून हा पुरावा पोलिसांना दिला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयिता विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप