नाशिककरांसाठी आनंदाची बातमी! आता गोवा फक्त दोन तासात

नाशिक । प्रतिनिधी

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी असून आता गोव्याला फक्त दीड ते दोन तासात जाता येणार आहे. नवीन वर्षात नाशिक गोवा विमानसेवा सुरू होणार असल्याने नाशिककरांचा नाशिक गोवा प्रवास सुखद होणार आहे.

येत्या जानेवारी पासून केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत स्पाईस जेट कंपनी नाशिक गोवा विमानसेवा देणार असून याच दरम्यान ही कंपनी दिल्ली आणि हैदराबाद विमानसेवा देखील सुरू करण्याची शक्यता आहे. दरम्यान सद्यस्थितीत ओझर विमानतळावरून सुरु असणाऱ्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्याच धर्तीवर आता नाशिक गोवा विमानसेवा सुरु होणार असल्याने नाशिककरांना चांगलाच फायदा होणार आहे.

दरम्यान केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने पालकमंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून या संदर्भात माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक – गोवा गोवा विमानसेवा सुरू करण्याची मागणी होती. ती आता पूर्ण झाल्याने जानेवारीपासून नाशिककरांना गोवा जाता येणार आहे.

त्यामुळे आता नाशिककरांना दिड ते दोन तासांत गोवा पोहचता येणार असून यासोबत पर्यटनवाढीला देखील चालना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.