नाशिक पदवीधर निवडणूक; भाजप-शिंदे गटाच्या सस्पेन्समुळे तांबेंना फायदा की फटका

नाशिक : सध्या पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडत आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी लढत दिसून येत आहे. भाजपने अद्यापही पाठिंबा जाहीर केला नाहीये. त्यासोबतच शिंदे गटाचाही पाठिंबा कुणाला याबाबत जाहीरपणे पक्षाने माहिती दिली नाहीये. त्यामुळे ‘भाजप-शिंदे’ युतीचा पाठिंबा कोणाला यावर अद्यापही प्रश्न चिन्ह तसेच आहे. दरम्यान याबाबत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी महत्वाचे विधान केले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात अनेक घडामोडी झाल्या. कोणाचा पाठिंबा कोणाला असणार या बाबतच्या चर्चांना उधाण आले. महाविकास आघाडीचा पाठिंबा शुभांगी पाटील यांना जाहीर झाला. मात्र भाजपने अद्यापही पाठिंबा जाहीर केला नाही. त्यांचा सत्यजित ताम्बेंना छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चा आहे. दरम्यान दादा भूसेंनी महत्वाचे विधान केले आहे. नाशिक मतदारसंघात पक्षाचा पाठिंबा कोणाला याबाबत भाजप आणि शिंदे गटाने भूमिका जाहीर केली नाही..? या प्रश्नाचे उत्तर देताना ‘पक्षाचा जो काही आदेश येतो त्याचे पालन करणे शिवसैनिकांचे काम असून या क्षणापर्यंत कुठलाही आदेश नाही, आदेशाला खूप वेळ लागणार नाही आदेश आला कि पालन केले जाईल’ असं ते म्हणाले त्यामुळे आता आणखीच सस्पेन्स निर्माण झाला आहे. भाजप-शिंदे गटाच्या सस्पेन्समुळे तांबेंना फायदा होणार की फटका बसणार असाच प्रश्न आता निर्माण झाला आहे.

यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गट या युतीचा पाठिंबा कुणाला हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये. पदवीधर मतदारसंघ निवडणूकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आतापर्यंत सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत पहायला मिळत आहे. मात्र भाजपचा पाठिंबा कोणाला हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

आज शेवटच्या दिवशी शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे हे दोघे उमेदवार नगर जिल्ह्यात प्रचार करत आहेत. मात्र भाजपचा पाठिंबा कुणाला हे अद्यापही जाहीर नाहीये. भाजप पक्षाने अद्याप कुणालाही पाठिंबा जाहीर केलाच नाहीये. असं असलं तरी भाजपाचा सत्यजित तांबे यांना छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर शिंदे गटाकडूनही पक्षाचा जो काही आदेश येतो त्याचे पालन करणे शिवसैनिकांचे काम असून या क्षणापर्यंत कुठलाही आदेश नाही अशी माहिती देण्यात आली आहे.