शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्या'नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी'

‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’

नाशिक । प्रतिनिधी

अमरावती, मालेगाव, नांदेड याठिकाणी झालेल्या दंगलीचे तीव्र पडसाद सध्या राज्यातील राजकारणात पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने याविषयी आक्रमक भूमिका घेत नाशकात आंदोलन सुरु केले आहे.

दरम्यान त्रिपुरा येथील घटनेनंतर राज्यातील काही भागांत दंगलीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे राज्यभर वादंग पसरले होते. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राज्यातील अमरावती, मालेगाव, नांदेड येथे झालेल्या हिसंक घटनेच्या निषेधार्थ नाशिक भाजपा आज रस्त्यावर उतरली.

यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात भाजप आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप