नाशिक । प्रतिनिधी
नाशिकच्या गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होतंच असून काल रात्री नऊच्या सुमारास अज्ञात संशयितांनी एका पोलीस पुत्राचा खून केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. प्रवीण गणपत काकड (रा. म्हसरूळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, काल रात्री आठ साडेआठ वाजेच्या सुमारास प्रवीण हा मद्य सेवनासाठी म्हसरूळ गावाजवळील मोकळ्या जागेत बसलेला होता. याचवेळी चार ते पाच संशयितांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात प्रवीणच्या डोक्यात आणि पोटावर मोठ्या प्रमाणात वार झाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला .
मयत प्रवीणचे वडील नाशिक पोलीस खात्यात नोकरीला होते. काही दिवसांपूर्वीच वडील गणपत काकड पोलीस खात्यातुन निवृत्त झाले होते. प्रविनच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत
विशेष म्हणजे प्रवीण काकड हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याच्याविरोधात प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दरोडा घालणे, प्राणघातक हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर सुटून आला होता, मात्र त्यांनतर त्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील हल्ला केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मयत प्रवीणचे वडील नाशिक पोलीस खात्यात नोकरीला होते. काही दिवसांपूर्वीच वडील गणपत काकड पोलीस खात्यातुन निवृत्त झाले होते. त्यानंतर नुकताच कारागृहातून बाहेर आलेल्या प्रवीणची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.