चंद्रकांत पाटलांची मानसिकता तपासावी लागेल -राऊत

” चंद्रकांत पाटलांची मानसिकता तपासावी लागेल ” असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे,तर ” माझा शोक संदेश त्यांना मी पाठवेल, त्यांच्या साठी शोक असेल , तर यासाठी शोक सभा घेऊ…!” असा टोला देखील त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. आज नाशिकमध्ये माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.

शिवसेना नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थित विविध कार्यक्रम संपन्न झाले .तर गेल्या अनेक दिवसांपासून देशाची राजधानी दिल्ली येथे तीन शेतकरी कायदे रद्द करावे यासाठी संपूर्ण देशातील शेतकरी आंदोलनाला बसले होते,काल हे कायदे मागे घेण्यात आले.या शेतकरी कायद्यांवरून देखील संजय राऊत यांनी विरोध करत, शेतकरी मालक नव्हे गुलाम करण्याचा हा कायदा होता, शेतकऱयांच्या जमिनीवर कब्जा करणारा हा कायदा असल्याचे देखील राऊत यांनी म्हंटले आहे.

गाड्या घातल्या, गुंड पाठवले, मात्र शेतकरी हटला नाही.त्याचबरोबर जालियनवाला बागेत ईस्ट इंडिया कंपनी ने गोळ्या घातल्या तसच ,शेतकऱयांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना चिरडले गेले.तर हे स्वतंत्र्य आहे, हे लढवून मिळालं आहे, भिकेतुन नाही.आणि दीड वर्षांपासून शेतकरी हा तणाव, दबावात होता त्या जोखडातून तो बाहेर निघाला असल्याचे देखील शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हंटल आहे.त्याच बरोबर
जे कायदे रद्द झाले ते सद्भभावनेने नाही, शेतकरी मागे हटायला तयार नाही ज्या १३ राज्याच्या पोट निवडणुकांमध्ये भाजपचा परभाव झाला तसाच उद्याच्या पंजाब आणी उत्तर प्रदेशच्या निडणुकीत देखील पराभव होईल या भीतीने हा निर्णय घेतल्याचा टोला देखील संजय राऊत यांनी भाजपाला लगावलाय.


शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची उम्मेदवारी विधानपरिषदेसाठी नाकारण्यात आली आहे. या मुद्द्यावरून बोलताना ” सुनील शिंदे यांनी ठाकरे कुटुंबासाठी मोठा त्याग केला आहे,आदित्य ठाकरेंसाठी त्यांनी आपले शीट देखील सोडले होते, त्यामुळे त्यांना उम्मेदवारी देण्यात आलीये, तर रामदास कदम यांच्यावर नाराजी नाही असे संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले. जरी राऊत यांनी कदम यांच्या मुद्द्यावरून नाराजी नसल्याचे बोलले असले तरी , तरी कदम यांची मागच्या काही दिवसात जी ऑडिओ क्लिप वायरल झाली होती ती घटना कदम यांना भोवल्याची चर्चा सध्या सुरु आहे…
त्याच बरोबर st कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून राऊत यांनी बोलतांना म्हंटले आहे कि, या मुद्द्यावर परिवहन मंत्री दिवस रात्र लक्ष घालून आहे. तर आम्हाला अस वाटत कि st कर्माचाऱ्यांचे प्रश्न सुटावे आणि ते सोडवले देखील आहे.आणि त्याचबरोबर विलानीकरन हा एकच विषय राहायला असून हायकोर्टाचे काही निर्देश आहे त्या नुसार ते काम करतील असे देखील राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.