या रथ यात्रेने “त्रंबकेश्वर” नगरी दुमदुमली

दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक सोहळे मोठ्या भक्तिमय वातावरणात संप्पन होत असतात ,नाशिकच्या “त्रंबक” नगरीत देखील त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली गेली. मोठ्या भक्तिमय वातावरणात त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर “भगवान त्र्यंबकराजाचा रथोत्सवाचा सोहळा” आकर्षक अश्या विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि देवस्थानच्या वाद्य पथकाच्या निनादात संपंन्न झाला,तर हा रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले.यावेळी भगवान त्र्यंबकेश्वराची दुपारच्या सुमारास पालखी काढण्यात आली. परंपरा खांडित होऊ नये म्हणून पालखीतून मूर्ती रथात ठेवण्यात आली होती.तर काही वेळ मूर्ती रथात ठेऊन मूर्ती परत पालखीत ठेऊन या मिरवणुकीला सुरुवात झाली. पालखीत पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवण्यात आला होता.पालखीची मिरवणूक निघण्यापूर्वी पालखीची पारंपरिक पूजा सरदार विंचूरकरांच्या वतीने त्यांच्या पुरोहितांनी केली. शाही पेशवे थाटात निघालेल्या या रथाच्यादुतर्फा भाविकांनी रथाचे स्वागत करत दर्शनाचा लाभ घेतला.

सायंकाळच्या सुमारास ६ वाजेला हा रथ कुशावर्त तीर्थाजवळ पोहचला आणि याठिकाणी भगवान त्रंबकराजाच्या मूर्तीची नित्यनैमित्तिक पूजा पार पडली .
आजही देवस्थानच्या पदरी भालदार-चोपदार, शागीर्द आदी पर्द कार्यरत आहेत.त्यानुसार या रथोत्सवात भालदार-चोपदार आदींसह देवस्थानचे विश्वस्त मंडळ,त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी,मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी आदी सहभागी झाले होते…