या वर्गात असताना अभिनेत्री प्राजक्ता माळी पडली प्रेमात

प्राजक्ता माळी. अवघ्या कमी कालावधीत या अभिनेत्रीने आपल्या कामाचा ठसा फिल्म इंडस्ट्रीत उमटवला आहे.हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती प्रत्यक घराघरात पोहचली आहे.तीच सूत्रसंचालन अनेकांना भावत..तिची बोलण्याची शैली अनेकांना भुरळ पाडते. त्यामुळे आता मोठमोठ्या शो मध्ये आपल्याला प्राजक्ता माळी दिसते.

निमित्त होत नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या श्रीगणेशाच..येत्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान नाशिकमध्ये साहित्य संमेलन होत आहे.आणि त्याची सुरुवात प्राजक्ता माळी यांच्या प्राजक्तप्रभा या कार्यक्रमातून झाली..प्राजक्ताला कविता करण्याची खूप आवड आहे.तिचे दोन कविता संग्रह आतापर्यंत प्रकाशित झाले.अन नुकताच छगन भुजबळ यांच्या हस्ते ही तिसरा प्राजक्तप्रभा हा तिचा नवीन कवितासंग्रह प्रकाशित झाला.

कार्यक्रमात प्राजक्त माळी यांची प्रकट मुलाखत झाली.या मुलाखतीत त्यांनी अनेक आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला,अन त्या ही, आठवणीला त्या विसरल्या नाही आणि..मी अकरावीत शिकत असतानाच प्रेमात पडले होते.अस प्राजक्तानी सांगताच रसिक प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.हो मी प्रेमात पडले,पण जास्त काळ काही ते टिकलं नाही,आणि त्यामुळे हे सर्व त्यांनी आपल्या कवितांमध्ये उतरवलं.. जसच तस..