पेट्रोल भरण्यास हेल्मेट न दिल्याने एकास मारहाण

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या दसक भागातील आढावा पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी हेल्मेट न दिल्याने एकाने हेल्मेट धारक दुचाकी चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

सध्या नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांच्या संकल्पनेतून “नो हेल्मेट ,नो पेट्रोल “ही हेल्मेट सक्तीची मोहीम राबविली जात आहे. नाशिकरोड-जेलरोड भागातील दसक परिसरात असलेल्या आढाव पेट्रोलियम या पेट्रोल पंपवर आकाश विश्वकर्मा हा युवक पेट्रोल भरून जात असताना एका अज्ञात युवकाने त्याच्याकडून हेल्मेट ची मागणी केली. यावेळी आकाश याने हेल्मेट देण्यास नकार दिल्याने अज्ञात युवकाने आकाशला बेदम मारहाण केली. त्याचबरोबर आकाशकडे असलेल्या हेल्मेटची तोडफोड देखील या अज्ञाताकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान अज्ञात व्यक्तीविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आली असून नाशिकरोड पोलीस याचा अधिक तपास करत आहे..