नाशिक । प्रतिनिधी
आपल्या डॅशिंग व्यक्तिमत्वामुळे नेहमी चर्चेत असणारे संभाजी राजे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संभाजी राजेंनी भर पावसात विश्रामगड किल्ला सर करीत सर्वांना आश्चर्य चकित केले आहे.
निमित्त होते शिवपदस्पर्श दिनाचे. छत्रपती शिवरांयानी या दिवशी म्हणजेच २२ नोव्हेंबर १६५९ रोजी विश्रामगडावर विश्रांती घेतली होती. या इतिहासाला उजाळा देत याची आठवण म्हणून संभाजी राजेनि स्वतः भर पावसात किल्ला सर करीत किल्ल्यावर शिवपदस्पर्श दिन साजरा केला. यावेळी उपस्थित ‘शिवभक्तांनी जय शिवाजी,जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी विश्रामगड दणाणून गेला होता.
दरम्यान सुरतेच्या लुटेहून येतांना शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर विश्रांती केल्याचा इतिहास सांगितला जातो. त्यामुळे संभाजी राजेंच्या उपस्थितीत आज या किल्ल्यावर शिवपदस्पर्श दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसातही संभाजी राजे यांनी किल्ल्यावर चढाई करत शिवरायांना अभिवादन केले आहे.