गोदातीरी रंग रंगात रंगले !

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या गोदा किनारी अनोखी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा रंगली असून यामध्ये राज्यभरातून चित्रकार सहभागी झाले आहेत.

दरम्यान 21, 22, 23, 24 नोव्हेंबर या दरम्यान ही स्पर्धा सुरू असणार आहे. पहिल्या दिवसापासूनच राज्यभरातील चित्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 27 ते 28 नोव्हेंबर दोन दिवस या सर्व चित्रांच प्रदर्शन असणार आहे.

या स्पर्धेच खास वैशिष्ट्य म्हणजे चित्रकारांच्या नजरेत गोदावरी कशी दिसते, ते गोदावरी किनारी बसूनच चित्रकार गोदामाईच सुंदर रूप रेखाटत आहेत.