नाशिक । प्रतिनिधी
म्हसरूळ परीसरात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान रविवारी रात्रीच्या सुमारास प्रवीण काकड या तरुणाची धारदार शस्राने हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी म्हसरूप पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवत गुन्ह्यातील फरार आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत.
हि हत्या वर्चस्व वादातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी अधिक तपास म्हसरूळ पोलीस करीत आहेत.