परमबीर सिंह भारतामधेच, कुठेही पळून जाणार नाही : वकील पुनीत बाली

मुंबई । प्रतिनिधी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग भारतात असून त्यांचा पळून जाण्याचा कोणताही हेतू असा गौप्यस्फोट स्वतः परमबीर सिंह यांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. सिंग यांना महाराष्ट्र पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने ते हजर होत नाहीत, असेही वकिलांनी न्यायालयात म्हटले आहे.

परमबीर सिंह यांच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना अंतरिम संरक्षण दिल आहे. याआधी न्यायालयाने परमबीर सिंह कुठं आहेत हे समजल्याशिवाय अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिला होता. ‘परमबीर सिंह हे फरार नाही. त्यांना कुठंही पळून जायचं नाही. त्यांच्या जीवाला धोका आहे. ते महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी धमकी दिली आहे,’ असे आरोप वकिलांनी केलेत. पुढील ४८ तासात कोणत्याही सीबीआय किंवा इतर कोर्टात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला आहे.

दरम्यान सुप्रीम कोर्टाकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयनं परमबीर सिंह यांना 6 डिसेंबरपर्यंत अटक करु नये, असे आदेश दिले आहेत.