नाशिकमध्ये सिटी लिंक सोबत इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा

नाशिक । प्रतिनिधी

अलीकडे सुरु झालेल्या सिटी लिंक बसला (Nashik City Link Bus) शहरासह मनपा हद्दीत चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच महापालिकेने शहर बस सेवेसोबत (Nashik NMc Bus Service) पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक बसचा (Electric Bus) निर्णय घेतला आहे. सध्याच्या सीएनजीसोबत इलेक्ट्रिक बसचा निर्णय झाला असला तरी अद्याप इलेक्ट्रिक बस सुरू झालेल्या नाहीत. या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेने केंद्राकडे पाठवला असून या प्रस्तावास हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे.

नाशिक मनपाने सिटी लिंक बससेवा सुरु केली. त्यानंतर अल्पवधीतच या शहर बस सेवेला नाशिकककरांचा (Nashik Citizens) चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र याचबरोबर इलेक्ट्रिक बस देखील या सेवेत येण्यासाठी निर्णय घेतला. परिवहन सेवेसाठी सीएनजी बस शिवाय काही इलेक्ट्रिक बस घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिका स्थायी समितीने (NMC Standing Committee) पन्नास इलेक्ट्रिक बसचा प्रस्तावाला मंजुरी देत संबंधित प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविला आहे. मात्र अद्याप केंद्राकडून हिरवा कंदील न आल्याने विषय रखडला आहे.

नाशिक महापालिकेच्या सिटीलींक शहर बस वाहतूक सेवेतील इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या तर सध्याच्या पर्यावरण पूरक असलेली बस सेवा अधिक बळकट होण्यास मदत होईल. सुरवातीला सिटी लिंकच्या माध्यामातुन ५० बस शहरांत धावत होत्या. आजमितीला शहरात २५० हुन अधिक बस शहरातील विविध मार्गांवर धावत आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा अधिकाधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकार अनुदानाच्या रूपाने एका इलेक्ट्रिक बसला ५० लाख रुपये अनुदान आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक तसा प्रस्ताव महापालिकेला परवडणार आहे. प्रति बसला साधारण पंचावन्न लाखांचे केंद्राकडून अनुदान अपेक्षित आहे.

नाशिक महापालिकेने यापूर्वी केंद्र शासनाकडे पहिल्या टप्प्यात ५० बसला अनुदान मिळावे म्हणून प्रस्ताव पाठवला आहे. मात्र त्याला अद्याप केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सध्याच्या सिटी लिन बसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने इलेक्ट्रिक बस आल्यास आणखी चांगला फायदा मनपाला होईल.