मोठी बातमी..! नाशिक पालिका आयुक्त रमेश पवार यांची बदली

नाशिक: पालिका आयुक्त रमेश पवार यांची नाशिकच्या महापालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. पवार यांची अवघ्या दोन महिन्यांत बदली होत आहे. त्यामुळे आता नाशिक महापालिकेला आयएएस (IAS) अधिकारी आयुक्त म्हणून मिळणार आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटस्थ म्हणून रमेश पवार यांच्याबाबत चर्चा आहेत. दरम्यान अवघ्या काही दिवसांतच रमेश पवार यांची नाशिकच्या महापालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे आता नाशिकच्या महापालिका आयुक्त पदाची सूत्र डॉ. चंद्रकांत पुलकुंडेवार (IAS Dr. Chandrakant Pulkundewar) यांच्या हाती जातील. डॉ पुलकुंडेवार हे आयएएस अधिकारी असून ते आता नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त होणार आहे

म्हाडाकडे हस्तांतरित करावयाच्या सदनिकांच्या कथित घोटाळ्याचा ठपका नाशिक महापालिकेचे तात्कालीन आयुक्त कैलास जाधव यांच्यावर ठेवण्यात आला होता. यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जागी नाशिक महापालिका आयुक्त पदी रमेश पवार यांची वर्णी लागली होती. दरम्यान रमेश पवार यांची अवघ्या दोन महिन्यांत बदली झाली आहे. नाशिकच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणारे रमेश पवार यांना महापालिकेत काम करण्याचा तगडा अनुभव होता. त्यांनी सहायक आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त अशा अनेक पदांवर काम केले होते. नाशिकच्या महापालिका आयुक्त पदाची सूत्र स्वीकारण्याआधी ते मुंबई महापालिकेत सहआयुक्त या पदावर कार्यरत होते.