शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्यानाशिक महापालिका निवडणूक लांबणीवर?

नाशिक महापालिका निवडणूक लांबणीवर?

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकसह राज्यातील दहा महानगर पालिकेच्या निवडणूका लांबणीवर पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण राज्यातील ओबीसी आरक्षणासारख्या मुद्द्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच निवडणूकांवर याचा परिणाम होणार का अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक सोबत इतर महापलिकच्या निवडणुकांची तयारी जोर धरून होती. या पार्श्वभूमीवर काही महापालिकांच्या प्रभाग रचनेला देखील वेग आला होता. त्यानुसार नाशिक मनपाच्या निवडणुकांचा धुराळा उडणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र राज्यातील ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुकांवर गदा आली आहे. परंतु या आरक्षणाशिवाय निवडणूका नकोत असे सत्ताधाराऱ्यांसह विरोधकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे संकट आ वासून उभेच असल्याने महापालिका निवडणूक लांबणीवर पडणार आहेत.

याच अनुषंगाने महापालिका निवडणूक लांबणीवर पडणार असल्याने प्रशासक नियुक्त करण्याची सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये नाशिकसह, मुंबई, ठाणे, पुणे, नागपुर, पिंपरी-चिंचवड, सोलापूरसह अन्य १० महापालिकांच्या निवडणूका पार पडणार आहेत. मात्र अशातच ओबीसी आरक्षण आणि कोरोना यामुळे निवडणुकाकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकलेला नाही. मात्र येत्या मार्चमध्ये निवडणूक होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तर दुसरीकडे या महापालिकांवर प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा निवडणूकीसाठी फार महत्वाचा आहे. अन्यथा त्यावर निर्णय न घेतल्यास त्याचा फटका सरकारला निवडणूकीत बसू शकतो. दुसऱ्या बाजूला प्रशासकांच्या हाती कारभार गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थात लोकशाही व्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप