नाशिक । प्रतिनिधी
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे दोन दिवसीय नगर आणि नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर असतांना राज्यपाल महोदयांनी बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंगास सहपरिवार भेट देत महापूजा केली आहे.
रविवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी इगतपुरी -नाशिक दौऱ्यावर आले होते. तर आज सोमवारी त्र्यंबकला भेट दिली. या भेटीत त्यांनी कुशावर्तावर दर्शन घेत त्र्यंबकेश्वर मंदिरात परिवारासोबत महापूजा केली आहे.
दरम्यान नाशिकसह शिर्डीला देखील भेट दिली आहे. त्यात त्यांनी शनी शिंगणापूरच्या शनी महाराजांचे, शिर्डीचे साई बाबाचेही दर्शन घेतले. विशेष म्हणजे या तिन्ही ठिकाणी दर्शन घेत राज्यपालांनी कुटुंबासमवेत महापूजा देखील केली आहे. सर्व आजच्या दिवशी त्र्यंबकेश्वरला भेट देत दर्शन घेऊन महापूजा केली आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, त्र्यंबक नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, त्र्यंबक देवस्थानचे विश्वस्त पंकज भुतडा, भूषण अडसरे आदी उपस्थित होते.