‘या’ साठी नाशिक मनपाने पाठवला राज्य शासनाला ४०० कोटींचा प्रस्ताव

शहर मलजल व्यवस्थापनासाठी नाशिक महापालिकेने राज्य शासनाकडे 400 कोटींचा प्रस्ताव व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सादर केला आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीतील मळजल व्यवस्थापन सुरळीत व्हावे यासाठी महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नाशिक शहरातील चार मलजल निसारण केंद्राचे अत्याधुनिकिरन होणार आहे. या नदी जोड संवर्धन योजनेमुळे शहरातून वाहणाऱ्या नद्या उपनद्यांची स्वच्छता होणार असून गोदावरीच्या संवर्धनासाठी असलेल्या या योजनेचा लाभ शहर प्रदूषण मुक्तीसाठी होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.


शहरातील आठ रिव्हरगेज झोनमध्ये मलनि: सारण केंद्राची स्थापित क्षमता 360 एम एल डी इतकी आहे यापूर्वी उभारलेले मलनि: सारण केंद्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेले असले तरी अलीकडे राज्य प्रदूषण महामंडळामार्फत प्रक्रियेनंतर सोडण्यात येणाऱ्या मलजलाच्या निकषात कठोर बदल करण्यात आल्याने शहरातील मलिनि:सारण केंद्राचे आधुनिकरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे केंद्राच्या नदी संवर्धन योजनेतून शहरातील मलनि: सारण केंद्राच्या आधुनिकीकरण करणे शक्य होणार असल्याने या योजनेत नाशिक महानगरपालिकेचा समावेश व्हावा आणि मल: निसारण केंद्राचे आधुनिकीकरण होण्यासाठी केंद्रांनी निधी द्यावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत यातून मनपाने तयार केलेल्या डीपीआर मागील वर्षी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता.


मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत नाशिक सह राज्यातील पाणी पुरवठा आणि मलजल च्या प्रकल्पांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.या मध्ये नाशिकच्या 300 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तवाला मान्यता देण्यात आली आहे . पाणी पुरवठा योजणा हि प्रलंबित होती त्या योजने बाबत विधानसभेत लक्ष वेधी मांडल्यानतर त्याला तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गे लावण्याचे आश्वासन दिल्या नंतर आता त्याला शिंदे फडणवीस सरकार मध्ये मंजुरी मिळाली आहे. आता मलजल व्यवस्थापनासाठी नाशिक मनपा कडून प्रस्थाव पाठवण्यात आला आहे.