नाशिक । प्रतिनिधी
सोमवारपासून नाशिक शहरातील शाळा सुरू होणार असून दोन सत्रात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. तर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
दरम्यान कालच राज्यातील शाळा सुरु होण्यासंदर्भात निर्णय झाला. यानुसार येत्या सोमवार पासून म्हणजेच 24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. तयच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील शाळा सुरु होणार असल्याची माहिती नाशिक मनपा आयुक्तांनी दिली आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. ते यावेळी म्हणाले कि, नाशिक शहरात ओमायक्रोनची टक्केवारी जास्त असली तरी तीव्रता तेवढी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच घरी राहिल्याने लहान मुलांना अनेक प्रश्न पडत असून जसे कि महामारी, लॉक डाऊन, निर्बंध काय आहे? यामुळे लहान मुलांच्या मनावर मानसिक परिणाम होत असून इतर आजारांचे प्रमाण वाढते आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच ओमायक्रोन हा माईल्ड स्वरूपाचा असून घाबरून न जाता सर्वप्रकारची काळजी घेतली जात आहे. परिणामी रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी असून लहान मुलामधील पॉसिटीव्ह रेटही कमी आहे, म्हणून शाळा सुरु करण्यात येत आहेत.
ते पुढे म्हणाले कि प्रत्यक्ष शाळा सुरु करणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेणयात आला आहे. लहान बालकांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटल दाखल करण्याची गरज पडत नाही. मात्र घरात राहून मानसिक त्रास होतो, त्यामुळे लहान मुलांना प्रत्यक्ष शिक्षण मिळणं अधिक सोयीस्कर असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षण मिळावे यासाठी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.