संक्रातीच्या पूर्वसंध्येला पोलिसांचा छापा, चौघे जेरबंद

नाशिक | प्रतिनिधी
संक्रातीच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांनी छापा टाकला असून नायलॉन मांजाची विक्री चौघे ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे सुरवातीपासून कठोर कारवाईची मोहीम सुरू करूनही नायलॉन मांजा विक्री छुप्या पद्धतीने सुरू आहे.

मकरसंक्रांतीला पतंगोत्सव साजरा केला जातो. पतंग उडवण्यासाठी लागणारा मांजा वेगवेगळ्या प्रकारे बाजारपेठेत विकला जातो. त्यातीलच नायलॉन मांजावर सध्या बंदी आहे. परंतु याच नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या चौघांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नायलॉन मांजा विक्री करण्याऱ्या विरुद्ध कारवाई सुरू आहे. मात्र मकर संक्रात आली तर नायलॉन मांजाची विक्री अद्यापही सुरू आहे. त्यातच मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येला नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या संशयितांकडून ५१ नायलॉन मांजाचे गट्टे हस्तगत करण्यात आले असून ३५ हजारांची रोकड देखील पोलिसांनी जप्त केली आहे. तर संक्रांती निमित्त आज पोलिसांची भरारी पथक तैनात असून नायलॉन मांजा आढळल्यास थेट कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.