नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरूच, तब्बल १९२५ बाधित

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) कोरोना रुग्णांचा (Corona Patient’s) उद्रेक झाला असून काल जिल्ह्यात दिवसभरात १९२५ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( Corona reports Positive) आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त (Nashik Administration) अहवालानुसार मागील चोवीस तासात १९२५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरात १३६८, नाशिक ग्रामीण विभागात ४३८, मालेगाव ४७, तर जिल्हाबाह्य ८२ अशी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दिलासादायक म्हणजे काल दिवसभरात जिल्ह्यात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही. मात्र आतापर्यंत मृत्यूचा आकडा हा ८ हजार ७६५ वर आहे. तर जिल्ह्यात सद्यस्थितीत ७८२४ कोरोना रुग्ण आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले असून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातही हे निर्बंध लागू होणार यात शंका नाही.