साहित्य संमेलन : नाशिक तू एक सुंदर कविता

नाशिक | प्रतिनिधी
कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनास नाशिककर रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी महाराष्ट्रभरातून आलेल्या कवींनी विविध विषयांवर काव्य, गझलच्या माध्यमातून भाष्य केली. यावेळी टाळ्या आणि वन्समोर ने उपस्थित रसिकांची दाद मिळविली.

इथे पहा कवी संमेलन :

यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी पूर्णवेळ उपस्थिती लावली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीधर देशपांडे यांनी भूषविले तर सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले.

यावेळी कवी दगडू लोमटे , सय्यद अल्लाउद्दीन , रवि कोरडे , प्रिया धारुरकर , मनोज बोरगावकर , वैजनाथ अनमुलवाड , भाग्यश्री केसकर , नंदकुमार बालुरे , मीनाक्षी पाटील , वाल्मीक वाघमारे , इरफान शेख , किशोर बळी , दिनकर वानखेड , अनिल जाधव , विजय शंकर ढाले , तीर्थराज कापगते , मनोज सुरेंद्र पाठक , विष्णु सोळंके , गजानन मानकर , संजय कृष्णाजी पाटील , रामदास खरे , प्रवीण बोपुलकर , गीतेश शिंदे , मनोज वराडे , वैभव साटम , गौरी कुलकर्णी , संगीता धायगुडे , विलास गावडे , डॉ . माधवी गोरे मुठाळ , अमोल शिंदे , प्रतिभा जाधव , अजय कांडर , विनायक कुलकर्णी , अविनाश चव्हाण , संजीवकुमार सोनवणे , विजय जोशी , अंजली बवे , प्रशांत केंदळे , दयासागर बन्ने , साहेबराव ठाणगे , प्रकाश होळकर , उत्तम कोळणावकर , संदीप जगताप , मिलिंद गांधी , रेखा भांडारे , विष्णु भगवान थोरे , कमलाकर देसले , राजेंद्र केवळबाई दिये , सुषमा ठाकूर , किरण काशिनाथ , दीपा मिरिंगकर , नीता शहा, लक्ष्मण महाडिक , काशिनाथ वेलदोडे , सुशीला संकलेचा आदी सहभागी झाले होते.