विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस आज नाशकात मात्र..!

नाशिक | प्रतिनिधी

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस आज नाशकात असून मात्र साहित्य संमेलनाला हजेरी लावणार का नाही याबाबत संभ्रम कायम आहे.

दरम्यान संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर फडणवीसांचे नाव नसल्याने नाशिक भाजपने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भुजबळांनी थेट संपर्क साधत फडणवीस यांना संमेलनाचे निमंत्रण दिले होते. त्यावर फडणवीस यांनी देखील संमेलनाला येणार असल्याचे कळवले.

त्यानुसार आज फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर असून मात्र दौऱ्यात संमेलन स्थळी भेटीचा उल्लेख नसल्याने फडणवीस संमेलनाला जाणार का नाही याबाबत अनिश्चितता आहे.

आज दुपारच्या सुमारास देवेंद्र फडणवीस नाशिक मध्ये दाखल होणार आहेत.