188
नाशिक । प्रतिनिधी
नाशकात गुन्हेगारी वाढतच चालली असून काही टवाळखोरांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये धारदार हत्याराने वार करीत विद्यार्थ्यांला जखमी केले आहे.
नाशिकच्या उत्तम नगर परिसरातील वावरे महाविद्यालया समोरील घटना आहे. यश सिंग अस जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच नाव असून यश हा आपल्या दोन मित्रांसोबत गप्पा मारत असताना दुचाकीवर आलेल्या टवाळखोरांनी अचानक हल्ला केला. हि घटना CCTV मध्ये कैद झाली असून पोलीस हल्लेखोरांचा तपास करीत आहे.
या घटनेननंतर पुन्हा एकदा नाशिक पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीने नागरिकही धास्तावले आहेत.