नवाब मलिक याना तात्काळ अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केलीय.नवाब मलिक बाहेर राहणे म्हणजे देशासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी म्हंटलंय.नवाब मालिकांकडून दहशतवाद्यांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न सुरू असून सत्तेत असलेली शिवसेना हे खपवून घेणार का असाही आरोप त्यांनी केलाय.
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील नवाब मलिक यांच्या वर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांच्यावर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी नितेश राणे यांनी केल्याने त्याला आता नवाब मलिक काय उत्तर देतात हे पाहणे देखील महत्त्वाचा असणार आहे.
मागच्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे त्यातच नवाब मलिक हे कारागृहाच्या बाहेर राहणे म्हणजे देशाला धोका असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नितेश राणे आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना ही मागणी केल्याचा पाहायला मिळाला.