नाशिक । प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा ईडी कोठडीचा मुक्काम वाढला असून विशेष न्यायालयाने ईडी कोठडीची मुदत ०७ मार्चपर्यंत वाढवली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना गुरुवारी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. २३ फेब्रुवारीला अटक केल्यानंतर मलिक यांची अंमलबजावणी संचालनालयाकडील नऊ दिवसांची कोठडी आज संपली.
त्यानंतर आज विशेष पीएमएलए कोर्टाने कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ०७ मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी सुनावली आहे.
दरम्यान ईडीने बेकायदा आणि राजकीय सूडबुद्धीने अटक केल्याचे सांगून ईडी कोठडीला मलिक यांनी हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिकेद्वारे आव्हान दिले होते. मुंबई हायकोर्टाने या याचिकेवर आता ७ मार्चला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे आता मंत्री नवाब मलिक ०७ मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी सुनावली आहे.
.