Home » नाशिक ग्रामीण पोलीस होणार ‘अधिक वेगवान’

नाशिक ग्रामीण पोलीस होणार ‘अधिक वेगवान’

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक ग्रामीण पोलिस दलाला चारचाकी आणि दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून त्या माध्यमातून पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवितानाच गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्याचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निर्भया पथकांच्या वाहनांचे अनावरण करण्यात आले. यावेळी हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री या निर्भया पथकाच्या वाहनांना मार्गस्थ केले. यावेळी १२ चारचाकी तर ८० दुचाकी पोलिसांच्या ताफ्यात सामील झाल्या आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागात पोलिसिंग करण्यास मोठी मदत होणार आहे..आणि गुन्हेगारी कमी करण्यास मदत होणार आहे. तर गुन्हेगारांवर देखील या माध्यमातून वचक बसणार आहे.

यावेळी भुजबळ म्हणाले कि, आपला जीव धोक्यात घालून पोलिस सामान्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. सणा-समारंभात ते कुटुंबियांपासून दूर राहून सामान्य नागरिकांच्या रक्षणाला प्राधान्य देत असतात, अशा कर्तव्यदक्ष पोलिसांच्या अडचणी समजून घेतानाच त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून पोलिस दलाला आवश्यक असलेली चारचाकी आणि दुचाकी वाहने घेण्यात आली..

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या उपोषणासंदर्भात ते म्हणाले कि,संभाजीराजेनी उपोषण करू नये, अशी माझी विनंती, संभाजी राजे यांच्या मागण्या संदर्भात जे जे शक्य आहे ते सरकार करत असून कालच मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक घेतली आहे. शासन तुमच आहे आणि तुमच्या मागण्या मान्य करत आहे तर कोरोनामुळे काही गोष्टीना विलंब होत आहे हे खरं असले तरी लवकर सर्व प्रश्नावर तोडगा काढला जाईल असे देखील राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!