नाशिक । प्रतिनिधी
नाशिक शहरातून विविध भागातून रिक्षांची चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास भद्रकाली पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या सराईत चोरट्याकडून तब्बल सहा रिक्षा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
राजेंद्र मधुकर हिरे (सोयगाव, मालेगाव) अशी या अटक केलेल्या रिक्षा चोरट्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अन्सार अब्बास शेख या रिक्षाचालकाने (दि.१७) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपली रिक्षा (क्र एमएच १५ एके ६१९७) पिंपळ चौक परिसरात पार्क करून काही कामानिमित्त गेले होते. काम आटोपून परत आल्यानंतर पाहिले असते त्यांना त्यांची रिक्षा पार्क केलेल्या जागेवर दिसली नाही. परिसरात शोध घेतल्यानंतर रिक्षा चोरी गेली असावी असा संशय आल्याने त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची फिर्याद दाखल केली होती.
या चोरी प्रकरणी गुन्हे शोध पथकाचे अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्याआधारे संशयित संशयिताचा भद्रकाली नाशिक शहराचा शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही, यावरून रिक्षा चोरटा परगावचा असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला. तसेच संशयित राजेंद्र मधुकर अहिरे हा (दि.२२) रोजी पुन्हा भद्रकाली परिसरात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
भद्रकाली पोलिसांनी सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. संशयित हिरेकडे अधिक चौकशी केली असता त्याने नाशिक शहरातील विविध भागातून रिक्षा चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून जवळपास सहा रिक्षा ताब्यात घेतल्या. पुढील चौकशी करतेवेळी अशी कबुली दिली कि त्यांनी मालेगाव येथील रिक्षाचालकांना प्रवासी वाहतुकीसाठी भाड्याने दिल्या होत्या.
दरम्यान भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकाने या चोरीचा छडा लावला असून गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्ता पवार, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, हवालदार युवराज पाटील, हवालदार लक्ष्मण ठेपणे, पोलीस नाईक रमेश कोळी आदींच्या पथकाने याचा शोध घेऊन त्यांना अटक केली