Home » नाशिक मनपा निवडणुकीत मनसे सर्वच जागा लढवणार!

नाशिक मनपा निवडणुकीत मनसे सर्वच जागा लढवणार!

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहे ,तर दुसरीकडे नाशिकमध्ये देखील मनसे नेत्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला सुरवात केली आहे. याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांचा पहिला विभागीय मेळावा सिडको येथील माऊली लॉन्स येथे पार पडला.

आगामी मनपा निवडणुकीच्या येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचाराच रणशिंग फुंकले आहे. आज नाशिकच्या सिडको परिसरातील माऊली लॉन्स येथे मनसेने मेळावा घेत इच्छुक उमद्वारांची चाचपणी केली आहे. मोठ्या संख्येने या मेळाव्या दरम्यान मनसेचे कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

अनेक इच्छुकांनी यावेळी आपला परिचय देत आपण आगामी महापालिका निवडणुकीत कशाप्रकरे निवडून येवू याचे स्पष्टीकरण दिले. येत्या निवडणुकीत शहरातील सर्वच्या सर्व जागा मनसे पूर्णताकदीनिशी लढवणार असून नाशिक महापालिकेवर मनसेचाच झेंडा दिसेल असा विश्वास मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी व्यक्त केला आहे.

एकीकडे नाशिक महानगरपालिका निवडणुकांसाठी सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळी समीकरणे जुळवत असताना, दुसरीकडे नाशिक मनसेकडून आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. मात्र कुणासोबत जाणार कि एकटे लढणार याबाबत मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आदेश आल्यानंतरच पुढचा निर्णय जाहीर होणार आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!