शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्याजिल्ह्यातील 'ही' शाळा ठरली, पहिली कॉम्प्युटर लॅब असलेली शाळा

जिल्ह्यातील ‘ही’ शाळा ठरली, पहिली कॉम्प्युटर लॅब असलेली शाळा

नाशिक । प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथे होणाऱ्या नवीन आरोग्य उपकेंद्रामुळे गावातीलच नव्हे तर परिसरातील नागरिकांना आरोग्य विषयक अत्याधुनिक सोयी सुविधा व सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणासाठी उभारण्यात आलेली संगणक लॅब ही अतिशय उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथील आरोग्य उपकेंद्र नवीन इमारतीचे भूमीपूजन व जिल्हा परिषद शाळेच्या अत्याधुनिक संगणक कक्षाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गावातील व परिसरातील मुलांना जिल्हा परिषद शाळेत नवनवीन तंत्रज्ञान, संगणक शिक्षण तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळेतून जे शिक्षण दिले जात आहे, त्यामुळे शाळेतील मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जऊळके गावाने शाळेचा केलेला विकास परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अतिशय महत्वाची बाब आहे. तसेच आज ज्या अत्याधुनिक संगणक कक्षाचे लोकार्पण केले ते जिल्ह्यातील संगणक कक्ष असलेली पहिली जिल्हा परिषदेची शाळा आहे, याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी काढले.

जऊळके गावाच्या परिसरातील औद्योगिक वसाहतीमुळे तसेच गावाच्या जवळूनच जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे विकासात निश्चित भर पडली आहे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

यावेळी साखर संघाचे उपाध्यक्ष म्हणाले की, श्रीराम शेटे म्हणाले की, खासगी शिक्षण संस्थांप्रमाणे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत उपल्बध व्हावी यासाठी जऊळके गावाने शाळेचा केलेला विकास परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. नाशिक जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून करण्यात आला. वळण योजनांच्या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळाला असून अनेक ऐतिहासिक कामे मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप