Video : निफाड महाविद्यालयात ‘प्रपोज डे’ला तुफान राडा

नाशिक । प्रतिनिधी
सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे, त्यामुळे महाविद्यालयीन तरुण तरुणी फार्मात आहेत. मात्र निफाड येथे प्रपोज डेच्या दिवशी भलतंच घडलं आहे. येथील
कॉलेज कॅम्पस मध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

सध्या व्हॅलेंटाईन्स डे (Valentine’s Day) च्या निमित्ताने विविध ‘डेज्’ सेलिब्रेट केले जात आहेत. अशात काल प्रपोज डे (Propose Day) साजरा होत असतानाच ही मारामारी झाली. विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये कुठल्याशा कारणावरुन वाद झाला होता. या वादाचं पर्यवसान फ्री स्टाईल फायटिंगमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे. निफाड तालुक्यातील कर्मवीर गणपतराव मोरे महाविद्यालय बाहेर घटना घडली आहे.

https://youtu.be/kNH04v7jYZs

दरम्यान कालच्या दिवशी साजरा झालेल्या प्रपोज डे वरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ काही जणांनी इन्स्टाग्राम अकाऊण्टवर शेअर केले आहेत. हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचे व्हिडीओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही डोंगरे वस्तीगृह मैदानावरील दोन विद्यार्थिनींचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

दरम्यान कॉलेजमध्ये झालेल्या युवकांच्या या फ्री स्टाईलमुळे महाविद्यालयाची सुरक्षिततेबाबतचा प्रश्न उपस्थित होतो आहे. यासंदर्भात निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून निफाड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.