शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्याजिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे मोदींविरोधात आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे मोदींविरोधात आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी
काँग्रेसने देशभरात कोरोना पसरवण्याचे काम केल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केले होते. त्यानंतर देशभरात आणि राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून नाशिकमध्ये आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर राज्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज काँग्रेसच्या वतीने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन देखील केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. मोदी यांच्या वक्तव्यामुळे राज्याचा अपमान झाल्याचा आरोप करत आंदोलन केले.

राज्य सरकारने त्या काळात चांगल काम केलं, अस असतानाही पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत जे वक्तव्य केल, याचं आम्ही निषेध करतो. तसेच महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या मोदींना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलना वेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून पंतप्रधान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप