अहमदाबाद संघाचे अधिकृत नाव जाहीर, ‘या’ नावाने ओळखली जाणार

नाशिक । प्रतिनिधी

आयपीएलच्या (IPL) 2022 सीजनपासून टी-20 मध्ये लखनौ आणि अहमदाबाद फ्रँचायझी सामील होणार आहे. गुजरात टायटन्स यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हि घोषणा करण्यात आली आहे.

‘गुजरात टायटन्स’ (Gujarat Titans) हे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील अहमदाबाद फ्रँचायझीचे (Ahmedabad Franchise) अधिकृत नाव आहे. अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपवून अहमदाबादस्थित इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझीने अखेर त्यांचे नाव जाहीर केले आहे.

यंदाच्या आयपीएल मध्ये गुजरात टायटन्स व लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांचा समावेश झाला आहे. त्यामुळे आयपीएल चा यंदाचा हंगाम चांगलाच गाजणार आहे. जगातील सर्वात लोकप्रिय असलेली टी-२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (IPL) आपल्या १५ व्या हंगामाकडे (15Tth Season) कूच करत आहे.

दरम्यान आयपीएल २०२२ च्या आगामी हंगामासाठी खेळाडूंची लिलाव यादी जाहीर करण्यात आली आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ रोजी बंगळुरू येथे होणार्‍या दोन दिवसीय मेगा लिलावादरम्यान एकूण ५९० क्रिकेटपटूंची निवड करण्यात येणार आहे.