नाशिक भाजप कार्यालयाची तोडफोड नगरसेवकांना भोवली!

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरातील शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकासह महिला नगरसेविकेच्या पतीला तडीपारीची नोटीस पाठविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. यावेळी अनेक ठिकाणाहून नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला होता.

दरम्यान नाशिकमध्येही नारायण राणेंचा निषेध करत पुतळा जाळण्यात आला होता. तर शिवसेना नगरसेवक आणि युवासेना जिल्हा प्रमुख दीपक दातीर नगरसेविका किरण दराडे यांचे पती बाळा दराडे यांनी भाजपा कार्यालयावावर हल्ला केला होता. या या हल्ल्या प्रकरणी दोघांवर कारवाई झाली होती.

आता नव्याने या दोघांवर भाजपा कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. दोन वर्षासाठी हद्दपार का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.