Home » व्वा ! नाशिकचा सत्यजित बच्छाव आयपीएलच्या लिलाव यादीत !

व्वा ! नाशिकचा सत्यजित बच्छाव आयपीएलच्या लिलाव यादीत !

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला आनंदाची बातमी मिळाली असून नाशिकचा रणजीपटू सत्यजित बच्छाव याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित येत्या आयपीएल लिलाव यादीत निवड झाली आहे.

दरम्यान यंदाच्या हंगामातील खेळाडूंचा लिलाव येत्या १२ व १३ फेब्रुवारीला होणार आहे. तत्पूर्वी या लिलावासाठीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये सत्यजित बच्छावची निवड झाली आहे. सध्या ३४० भारतीय खेळाडूंसह १४ सहयोगी देशातील २२० खेळाडू मिळून ५९० क्रिकेटपटुंवर बोली लागणार आहे. दहा संघानी खेळाडूंची पसंती दर्शविल्यानंतर गेल्या महिन्यात जरी करण्यात आलेली आधीची १२१४ खेळाडूंची यादी कमी करून ती ५९० पर्यंत आली आहे.

पुढील आठवड्यात पार पडणाऱ्या या लिलाव प्रक्रियेत आता नाशिकचा रणजीपटू सत्यजित समावेश झालं आहे. मागील तीन रणजी हंगामात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्वाचा गोलंदाज झालेला आहे.

यंदाच्या हंगामात नोंव्हेबर महिन्यात झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी ट्वेंटी स्पर्धेतील सहा सामन्यात सत्यजितने २२ षटकांत ७ बळी घेतले . त्यामुळे सध्या सत्यजितची कामगिरी उत्कृष्ट असल्याने त्याची निवड होणार असल्याचे दिसून येत आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!