फोन टॅपिंगप्रकरणी फडणवीसांना नोटीस, सह पोलीस आयुक्तांचा फोन… म्हणाले!

मुंबई । प्रतिनिधी

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राज्याचे (Maharashtra) भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नोटीस (Notice) पाठवली आहे. फोन टॅपिंग प्रकरणी (Maharashtra Phone Tapping Case) फडणवीस यांना मुंबईतील बीकेसी पोलिसांनी नोटीस बजावून त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे. मात्र तत्पूर्वीच सहपोलीस आयुक्तांनी फोन करून पोलीस स्टेशनमध्ये न येण्याचे कळवले, असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान फोन टॅप प्रकरणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली होती. यानुसार त्यांना उद्या मुंबई बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये हजार राहायला सांगितले होते. मात्र नुकताच फडणवीस यांनी ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे कि, ‘सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात.’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

या ट्विटनंतर उद्या देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसात जाण्याची गरज नसल्याचे दिसून येत आहे. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले कि, उद्या म्हणजेच रविवारी पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवणार असल्याचे सांगितले आहे. फोन टॅप प्रकरणी मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

मात्र फडणवीस यांनी नुकतीच माहिती दिली कि, या प्रकरणी सहपोलीस आयुक्तांचा फोन आला होता, त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. तसेच मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात.

विरोधी पक्षनेता म्हणून मला माहिती कोठून मिळाली हे उघड न करण्याचा विशेषाधिकार आहे. परंतु, मी एकदा गृहमंत्री होतो आणि मला माझी जबाबदारी समजते. जर खोटा गुन्हा नोंदवला गेला असेल आणि पोलिसांना काही मदत हवी असेल तर मी प्रतिसाद देईन. त्यामुळे उद्या पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील फोन टॅपिंग प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी पुणे आणि मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या कार्यकाळात अनेक नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप आहे.