नाशिक | प्रतिनिधी
इगतपुरी परीसरात बिबट्याच्या मानवी हल्ल्यांच्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे. तालुक्यातील चिंचलेखैरे येथे पुन्हा बिबट्याने एका महिलेला ठार केल्याची घटना समोर आली आहे.
इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा थरार समोर आला असून पुन्हा एका महिलेला शिकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर महिला चिंचले खैरे येथील शेतावर राहत होती. यावेळी रात्रीच्या सुमारास बिबट्याने या महिलेवर हल्ला केला.
यावेळी बिबट्याने या महिलेस फरफटत नेत जंगलात नेले. घरात कोणी नसल्याने सकाळी महिलेचा शोध घेतला असता ही महिला या महिलेचा मृतदेह जंगलात आढळून आला.
दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचे हल्ले वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.