रामकुंडावरील नमामी गोदा सोहळ्यास गालबोट

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकच्या रामकुंडावर नमामी गोदाचे भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाला गालबोट लागले असून भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज नाशिकच्या रामकुंडावर नमामी गोदा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सदर कार्यक्रमाला परवानगी नसल्याने पोलीस आणि भाजप नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते नमामी गोदा प्रकल्पाचे कार्यक्रम पार पडला. मात्र नमामी गोदा कार्यक्रमानंतर पोलीस प्रशासन आणि भाजपा कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

विशेष म्हणजे महापौर सतीश कुलकर्णी यांचा कार्यकाळ आज संपत असल्याने घाईगडबडीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर रामकुंडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पोलीस आणि कार्यकर्तेच भिडल्याने सदर कार्यक्रमास गालबोट लागले आहे.