महापौरांना कार्यक्रमांची लगीनघाई भोवली, पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक । प्रतिनिधी

पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी महापौर सतीश कुलकर्णी, भाजप शहाध्यक्षांसह पाच जणांविरोधात पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची परवानगी नसताना नमामी गोदा कार्यक्रमाचे आयोजन केल्या प्रकरणी माजी महापौर सतीश कुलकर्णी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे ,नाना शिलेदार,विजय साने, लक्ष्मण सावजी, किरण गायधनी यांच्या विरोधात पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या गोदा काठावरील रामकुंड परिसरात रविवारी नमामी गोदा आणि पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

दरम्यान या कार्यक्रमाला पोलीस आयुक्तांची परवानगी नसताना व सहाय्यक आयुक्त यांनी येथे वाद्य वाजवण्यास देखील परवानगी दिली नसताना ,या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून गर्दी जमवत पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंणघन केल्या प्रकरणी पंचवटी पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर या कार्यक्रमावेळी पोलिस आणि भाजप पदाधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्याचे देखील दिसून आले होते..