Home » ओबीसींचा इंपेरिकल डेटा तयार, आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ओबीसींचा इंपेरिकल डेटा तयार, आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

मागासवर्ग आयोगाने ओबीसींची ३२ टक्के ही संख्या वैध ठरवल्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यात फायदा होईल, असे मत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग यामुळे मोकळा होऊ शकेल, असे छगन भुजबळ म्हणाले. वेगवेगळ्या विभागांकडून आलेला ओबीसींचा डेटा हा २७ टक्क्यांच्या पुढेच आहे. आज दि. ०८ फेब्रुवारीला याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही मागासवर्ग आयोगाला डेटा दिला आहे. त्यानुसार त्यांनी इंपेरिकल डेटा तयार केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहच व्हाव्यात यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून मागासवर्ग आयोगाने दिलेल्या डेटामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यात फायदाच होईल, असे ते म्हणाले.

सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज (8 फेब्रुवारी) ओबीसी राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) याचिकेवर सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रष, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांसह संपूर्ण देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. सर्वोच्च न्यायालय ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत (OBC Reservation) काय निर्णय देते याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. 

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!