Home » पंचवटीत वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या विक्रीचा डाव उधळला

पंचवटीत वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या विक्रीचा डाव उधळला

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
मागील काही दिवसांत शहरातील काही भागात वन्यप्राणी विक्रीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आता शहरातील पंचवटीतील पूजेच्या साहित्य विकणाऱ्या दुकानातून कोट्यवधी रुपये किमतीची वन्यप्राण्यांची अवयवे पोलिसांनी जप्त केले आहेत. यामागेमोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापूर वनविभागाच्या विशेष गुन्हे अन्वेषण पथकाने पंचवटीत एका दुकानावर छापा मारत येथील सी फ्रंट घोरपड, साळींदर सारख्या वन्यजीवांचे अवशेषसह तयार केलेल्या फ्रेम जप्त करण्यात आल्या आहेत. वनविभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा, जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे अकरा गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांचे धागेदोरे नाशिकपर्यंत येऊन पोहचले आहेत.

कोल्हापूरचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी, सांगलीचे सहाय्यक वनसंरक्षक अजित सजणे, नाशिकचे गणेश झोले, सांगलीचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील, नाशिक दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल महेंद्र पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्या पथकाने पंचवटीतील लक्ष्मी पूजा साहित्य भांडार या दुकानात छापा मारला. येथून पोलिसांनी इंद्रजाल, समुद्री कंकाळ (सी फॅन), घोरपडीचे गुप्तांग, हट्टाजोडी, पंजा, साळींदर वन्यप्राण्यांच्या शरीरावरील काटे, डुकराचे दात हस्तगत केले आहे. या प्रकरणी दुकानदार कैलास कुलथे यास पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान या कारवाईसाठी पथकातील सहाय्यक वनसंरक्षक अजित साजणे यांनी एका बुवाबाजी करणाऱ्या बाबासारखा वेष धारण केला. दुकानात बनावट ग्राहक बनून हजेरी लावली. वन्यजीव विक्रीबाबतची त्यांनी खात्री पटवली. यांनतर विशेष सिग्नल देऊन पथकाने छापा टाकला. या दुकानातून विशेष वन गुन्हे पथकाने वन्यजीव संरक्षण कायद्यातील अनुसूची ०१ मधील वन्यप्राण्यांचे अवशेष हस्तगत केले आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!