Home » जिल्ह्यातील ‘हे’ सात पोलीस स्टेशन चकाकणार!

जिल्ह्यातील ‘हे’ सात पोलीस स्टेशन चकाकणार!

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नाशिक जिल्ह्यातील एकूण सात पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतींच्या बांधकामास मंजुरी मिळाली आहे.

याबाबत गृह विभागाचा निर्णय नुकताच पारित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात पोलीस स्टेशनला सुसज्य इमारती मिळणार असून पोलीस यंत्रणेला सुरळीतपणे कामकाज करण्यास अधिक मदत होणार असून सद्या भेडसावत असलेल्या कार्यालयाच्या समस्या यामुळे मार्गी लागणार आहे.

जिल्ह्यातील पोलीस विविध पोलीस स्टेशनच्या अतिशय जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारती तयार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित यंत्रणेला दिलेल्या होत्या. त्यानुसार शासन स्तरावर प्राधान्यक्रम ठरवून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सात पोलीस स्टेशनच्या इमारतींच्या बांधकामास मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सटाणा पोलीस स्टेशन, नाशिक शहर उपनगर पोलीस स्टेशन, सुरगाणा पोलीस स्टेशन, बाऱ्हे पोलीस स्टेशन सुरगाणा, रमजानपुरा पोलीस स्टेशन मालेगाव, लासलगाव पोलीस स्टेशन व येवला शहर पोलीस स्टेशन या एकूण सात पोलीस स्टेशनचा समावेश आहे.

जिल्ह्यातील अतिशय जुन्या झालेल्या इमारतीमध्ये पोलीस यंत्रणेला कामकाज करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यादृष्टीने आता जिल्ह्यातील सात पोलीस स्टेशनला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नवीन सुसज्य इमारती उपलब्ध होणार आहे.

या इमारतींच्या बांधकामास शासन स्तरावरून निधीची तरतूद होणार असून लवकरच या इमारतींच्या कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यांसाठी सुसज्य इमारती निर्माण होऊन यंत्रणेला काम करणे अधिक सोयीचे होणार आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!