धक्कादायक! नाशिकच्या तीन मुलासह एकाचा पाण्यात बुडून मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

केळवे समुद्रकिनाऱ्या (Kelve Beach)वर सहा जण बुडाल्याची (Drowned) दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तर चौघांना जीव गमवावा लागला आहे.

ओम विसपुते(नाशिक), दीपक वडाकाते(नाशिक), कृष्णा शेलार( नाशिक) अथर्व नागरे (केळवे) अशी मयत झालेल्या तरुणांची नवे आहेत. या दुर्दैवी घटनेने नाशिकवर शोककळा पसरली आहे.

अधिक माहिती अशी कि, येथील दोन स्थानिक मुले समुद्रात पोहण्यासाठी गेली होती. मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडत होती. यावेळी तिथे उपस्थित नाशिकचे चार तरुण त्याना वाचविण्यासाठी समुद्रात बुडाले. मुलं बुडत आहेत हे लक्षात आल्यानंतर या तरुणांनी या मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात उद्या घेतल्या. मात्र हे चौघेही पाण्यात बुडाले. या चौघांपैकी एक तरुण पोहणारा असल्यामुळे तो बचावला आहे. तर बुडणाऱ्या एका लहान मुलाही वाचवण्यात यश आले आहे.

दरम्यान या घटनेत एका स्थानिक मुलासह नाशिकच्या तिघांना जलसमाधी मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसही दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे..स्थानिकांच्या मदतीने चारही मृतदेह बाहेर काढले असून बचावलेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.