महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्यासाठी ऑपरेशनची गरज – आचार्य भोसले

नाशिक । प्रतिनिधी

ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शस्रक्रिया झाली, अशाच एका चांगली शस्रक्रिया महाराष्ट्राच्या बाबतीत होणे आवश्यक असल्याचे मत आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल होते. या दुखण्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया देखील केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध देखील केले होते. यावर आता भाजप अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहे. त्यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

ते या ट्विट मध्ये म्हणतात कि, ‘मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली त्यांना लवकर आराम पडो मात्र दोन वर्षांपासून त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्राची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्यासाठी सुद्धा एका चांगल्या Operation (शस्त्रक्रिया) ची गरज आहे.’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.,