मृणाल पाटील यांना ‘युथ आयकॉन पुरस्कार’

नाशिक । प्रतिनिधी

प्रकाशन क्षेत्रात कार्य करतांना सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवण्याऱ्या भारत विकास प्रबोधिनी या प्रकाशन संस्थेतर्फे आणि विकासाची वाट विचार मंचतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारार्थिंची नुकतीच निवड समितीच्या वतीने संस्थेचे मानद संचालक नितीनकुमार यांनी नुकतीच घोषणा केली. कोरोनाकाळात केलेल्या सामाजिक कार्याची तसेच आपापल्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या वर्षी प्रथमच शांती आनंद शिक्षण संस्था या पुरस्कारासाठी सहप्रयोजक म्हणून सहभागी होत आहे.

नाशिक येथे गेल्या ७ वर्षांपासून क्षेत्रात लिखाण कार्यरत असतांना सामाजिक कामातून आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या मृणाल पाटील यांस भारत विकास प्रबोधिनी व विकासाची वाट विचार मंच तर्फे भारत रत्न मदर तेरेसा युथ आयकॉन २०२१ चा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पूर्वी ही त्यांस विविध सामाजिक संस्थांचा पुरस्कार मिळालेला आहे.

प्रसिद्धीपासून लांब असलेल्या घटकांना व्यासपीठ मिळून देणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, पर्यावरण संवर्धनासाठी राज्यभर उपक्रम राबवणे, आदिवासी तसेच ग्रामीण भागात वैद्यकीय उपक्रमांचे आयोजन करणे आदी कार्यात सक्रिय सहभाग दिला जातो आहे. याच अनुषंगाने कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या घटकांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शासन निर्णयानुसार निवडक उपस्थितीत या कार्यक्रमाचे पुढील आठवड्यात मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. भव्य दिव्य सन्मानचिन्ह,विशेष गौरव चिन्ह, मदर तेरेसा मेडल, मानाचा शेला असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. त्यांच्या पुरस्कार निवडीबद्दल साई बहुउद्देशीय संस्थेच्या संगिता पाटील, डॉ. राम कुलकर्णी यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.