Home » नाशकातील ‘हे’ हॉटेल महापालिकेने केले जमीनदोस्त

नाशकातील ‘हे’ हॉटेल महापालिकेने केले जमीनदोस्त

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिकेने मंगळवारी (३० नोंव्हेबर) ला गंगापूर रोडवरील एका हॉटेल व्यावसायिकास दणका दिला आहे. महापालिकेने गंगापूर रोडवरील एका हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत संबंधित हॉटेल जमीनदोस्त केले आहे.

गंगापूर रोडवरील हॉटेल मॉडर्न कॅफे असे या हॉटेलचे नाव आहे. या हॉटेलच्या शेजारील प्लॉट धारकाने संबंधित हॉटेल बेकायदेशीर असल्याची तक्रार केली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने हि कारवाई केली आहे.

गंगापूर रस्त्यावर अनेक अनधिकृत हॉटेल, त्यातील नियमबाह्य़ बांधकामांवर कारवाई करताना प्रभावशाली व्यक्तींच्या हॉटेलला अभय दिले जात असल्याची नेहमीच ओरड होते. वाढता व्यवसाय लक्षात घेऊन अनेकांना आहे ती जागा कमी पडते म्हणून हॉटेलच्या आसपासचा मोकळा परिसर, वाहनतळाची जागा, रस्त्यावरील पदपथापर्यंतची जागा व्यापण्यास सुरू केली आहे. महापालिकेने आता अनधिकृतपणे थाटलेली, वाहनतळाच्या जागेत अवास्तव पसारा वाढविणाऱ्या सरसकट सर्व हॉटेलांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे .

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!