नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश ‘सर आँखो पर’!

नाशिक । प्रतिनिधी

शेडूल एक्स, एच व एच १ औषधे व इन्हेलर विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांनी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे यांच्यासमोरच लावावी आणि दुकानांमध्ये महिनाभराच्या सीसीटीव्ही कॅमेरे दर्शनी भागात लावावे असे आदेश जिल्हाधिकारी गंगाधरण यांनी दिले आहेत या आदेशाचे जिल्हा औषध नियंत्रण विभागाने ग्रामीण मध्ये ही तपासणी करून पालन झाले की नाही याची खात्री करावी अन्यथा कठोर कारवाई करावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यन सद्यस्थितीत मुलांमधील अमली पदार्थांचा होणारा गैरवापर व अमली पदार्थांचा अवैध तस्करीला प्रतिबंध करण्याचा प्रमुख उद्देशाने तसेच अनुचित घटनांना पायबंद घालण्यासाठी अमलीपदार्थ विरोधी मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. कारवाई प्रभावी राबवण्यासाठी जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी एका महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

दरम्यान गंगाथरण डी यांनी याबाबत परिपत्रकात म्हटले आहे कि, दिलेल्या कालावधीत औषध विक्रेत्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, या आदेशाचे जिल्ह्यातील सर्व विभाग आणि नाशिक ग्रामीण हद्दीतील सर्व औषध विक्रेते दुकानदारांना पालन करणे बंधनकारक असल्याचेही जारी केलेल्या आदेशात जिल्हाधिकारी गंगाथरण यांनी नमूद केले आहे.

शेड्युल एक्स (एच व एच १) औषधें विक्री करताना अधिकृत केमिस्ट धारकांकडून नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. औषध सौंदर्य प्रसाधने नियंत्रण कायद्यानुसार व शासनाच्या वेळोवेळी औषधें दिली जात नाही. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात दिलेले आदेशाचे पालन करण्याबाबत संघटना त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या तातडीच्या आदेशामुळे केमिस्ट बांधवांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.