नवनियुक्त आयुक्त रमेश पवार यांनी स्विकारला पदभार

नाशिक । प्रतिनिधी

महापालिकेचे माजी आयुक्त कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली झाल्यांनातर त्यांच्या जागी आयुक्त म्हणून रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून नाशिक महानगरपालिकेचे नवे आयुक्त रमेश पवार यांनी आज आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहआयुक्त म्हणून काम करणारे रमेश पवार हे आता नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदी रुजू झाले आहे.तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांच्या कडून रमेश पवार यांनी कार्यभार स्वीकारला. मुंबई महानगरपालिकेचा मोठा अनुभव असणारे आयुक्त म्हणून रमेश पवार यांच्याकडे पाहिले जाते.

माजी आयुक्त कैलास जाधव यांनी नवे आयुक्त रमेश पवार यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. रमेश पवार यांना महापालिकेतील कामकाजाचा तब्बल ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असून त्यांनी मुंबईतील व्हीजेटीआय संस्थेकडून पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

तर म्हाडाच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आयुक्त कैलास जाधव यांची बदली झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासकीय राजवट असताना नवीन आयुक्त रमेश पवार यांनी चार्ज घेतला असून पवार मातोश्रीच्या जवळचे असल्याची चर्चा आहे.