धर्मांतराचे आमिष दाखवत महिनाभर महिलेवर लैंगिक अत्याचार

नाशिक : कौटुंबिक असहाय्यतेचा फायदा घेत आधी धर्मांतराचे आमिष दाखवत महिलेवर महिनाभर अत्याचार केल्याची संतापजनक घटना नाशिकच्या सिन्नर मध्ये घडली आहे. महिनाभर महिलेला एका खोलीत कोंडून ठेवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सिन्नर पोलीस ठाण्यात कथित पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. प्रकरणातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे.

घडलेली घटना अशी की

पीडित महिला आणि तिचे कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील माळेगाव एमआयडीसी या परिसरात वास्तव्यात होते. पोटाची खळगी भरवण्यासाठी मिळेल ते काम ते करायचे. दरम्यान ३० नोव्हेंबर रोजी ही महिला याच औद्योगिक वसाहतीत रोजगार शोधत होती. रोजगाराच्या शोधात असताना या ठिकाणी दोन महिलांनी तिची विचारपूस केली आणि आपण देखील मुसळगाव एमआयडीसीत रोजगार शोधण्यासाठी जात असल्याचे सांगितलं. तिला विश्वासात घेऊन त्यांनी तिला ‘सोबत चल रोजगार मिळवून देतो’ असे म्हणत त्यांच्या घरी घेऊन गेल्या.

घरी घेऊन गेल्यावर ‘तिला विशिष्ट देवाची प्रार्थना कर तुला बरं वाटेल, तुझी तब्येत ठीक राहत नाही, त्यांची प्रार्थना केल्यावर तुझी परिस्थिती सुधारेल असं सांगून धर्मांतराचे आमिष दाखवले आणि सायंकाळी एका नावाच्या व्यक्तीला बोलवून घेतलं. त्याने काहीतरी पुटपुटत लाल रंगाचे पाणी महिलेला पाजलं, त्यानंतर महिलेला गुंगी आली. त्या रात्री घरात असलेल्या एका पुरुषाने तिच्यावर अत्याचार केला. महिलेला त्या ठिकाणीच डांबून ठेवण्यात आले. तिच्याकडील दागिने संशयित महिलांनी काढून घेतले आणि काळा धागा गळ्यात बांधला.

दरम्यान पुन्हा एके दिवशी महिला जेवण करून झोपल्यानंतर तीन जणांनी आळीपाळीने महिलेवर अत्याचार केला. त्यासोबतच कुणाला सांगितले तर तुझा खून करून टाकू अशी धमकी देत तिच्यावर सातत्याने अत्याचार सुरू ठेवले.

१७ डिसेंबर रोजी या महिलेचा पती तिला शोधत जोशीवाडी परिसरात आला होता. तेथे त्याने पत्नीला बघितल्यावर घरात आला. त्यावेळी संशयित यांनी दमदाटी करुन त्याला हुसकावून लावले व सदर महिलेच्या लहानग्या मुलास बळजबरीने ठेवून घेतले. त्याला पैशांसाठी भिक मागायला लावत गावात पाठविण्यात आले. न गेल्यास मारहाण करण्यात आली. तिच्या पतीला मारण्याची धमकी दिल्याने तो घाबरून जोशीवाडीकडे फिरकत नव्हता. मात्र, २९ डिसेंबरला एका मित्रासोबत येऊन तो पत्नी व लहान मुलगा यांना घेऊन जाऊ लागला. तेव्हा संशयितांनी आत्ताचे आत्ता सिन्नर सोडा, नाहीतर तुम्हाला ठार मारण्याचा दम दिला. तेव्हा घाबरून महिला आणि तिचा पती मुलांसोबत अहमदनगर नगर जिल्ह्यातील त्यांच्या गावी निघून गेले. तिथे महिलेने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले असता. त्यांनी हिम्मत एकवटून सिन्नर पोलीस ठाण्यात येऊन सर्व आपबीती सांगितली. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाकःल करण्यात आला आहे. यातील ४ आरोपी सध्या अटकेत असूनपिडीत महिलेला वेश्या व्यवसायासाठी विकण्याचा देखील प्रयत्न झाला असल्याचे तिने तक्रारीत म्हंटले आहे. दरम्यान धर्मांतराच्या नावाखाली महिलेला बळजबरीने घरात डांबून ठेवून तिच्यावर महिनाभर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सिन्नर परिसरात खळबळ पसरली आहे.