Home » अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीचे समन्स

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीचे समन्स

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

पनामा पेपर्सशी संबंधीत चौकशीसाठी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीन समन्स बजावले आहे. यापूर्वी दोन वेळा ऐश्वर्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण तिने चौकशीसाठी जाण्यास नकार दिला होता.

‘पनामा पेपर्स लीक’ प्रकरणात आता बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी ईडीने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला समन्स पाठवले आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला हे समन्स बजावले आहे. ज्या अंतर्गत तिला आता दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणात अनेक मोठ्या स्टार्स चा समावेश असून यात अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांचे ज्येष्ठ बंधू आदींची नवे पुढे आली आहेत. या प्रकरणात बच्चन कुटुंबीयांचे नाव समोर येताच मनी लॉड्रिंगचाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जात आहे.

पनामा पेपर लीक प्रकरणात एका कंपनीचे काही पेपर लीक झाले होते. हा डेटा एका जर्मन न्यूजपेपरने पनामा पेपरच्या नावाने ३ एप्रिल २०१६ मध्ये रिलिज केला होता. यामध्ये भारतासहित २०० देशांमधील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांचा समावेश होता. त्यांच्यावर मनी लॉंड्रिंगचा आरोप करण्यात आला होता.

त्यात बच्चन कुटुंबीतील अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन यांचा समावेश आहे. तसेच बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा देखील समावेश असल्याचे म्हटले जाते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!